पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे दूरदर्शन ठरली सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी

दूरदर्शन

लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन  वाहिनीनं जून्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आणल्या आहेत. या मालिका आजही तितक्याच पाहिल्या जात आहेत. रामायण,  महाभारत, सर्कस, द जंगल बुक सारख्या मालिका पुन्हा दाखवल्या जात आहेत. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा दूरदर्शनकडे वळला आहे यामुळे टीआरपीच्या यादीत दूरदर्शन वाहिनी वरचढ ठरली आहे. 

सलमानकडून रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मजुरांना धान्यपुरवठा

गेल्या काही दिवसांत या वाहिनीच्या व्ह्यूव्हरशिपमध्ये ४०,००० % ची वाढ झाली होती. विशेषत: सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत प्रेक्षक जास्त टीव्ही पाहत आहेत, असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. गेल्या १९ मार्चपासून मालिका, चित्रपट, जाहिराती, वेबसीरिजचं चित्रीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे वाहिन्यांकडे दाखवण्यासाठी नवे भाग नाहीत त्यामुळे जुन्याच लोकप्रिय मालिकांचे पुनर्प्रक्षेपण केलं जात आहे.

प्रेक्षकांसाठी कपिल घरातून करणार 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण?