पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

शशी थरुर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, त्यांना त्यांच्या जुन्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. सरकारविरोधात केल्या जाणाऱ्या टीकेचे स्वागत केले पाहिजे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशातील ४९ नामवंत व्यक्तींनी झुंडबळीविरोधात चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले होते. या नामवंत व्यक्तीविरोधात याच मुद्द्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यावर शशी थरूर यांनी थेट नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आपल्याविरोधात होणाऱ्या टीकेचेही स्वागतच केले गेले पाहिजे, अशा स्वरुपाचा आशय शशी थरूर यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

'धाडसी आणि कठोर निर्णय घेण्याची सरकारमध्ये ताकद'

प्रख्यात लेखक रामचंद्र गुहा, चित्रपटकर्ते अदूर गोपालकृष्णन आणि अनुराग कश्यप यांच्यासह ४९ जणांविरुद्ध देशद्रोह आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ जुलैला लिहिण्यात आलेल्या या पत्राच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्र लिहिणाऱ्या नामवंत व्यक्तींनी महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले असल्याचे शशी थरूर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न मनात कसलीही भीड न ठेवता सर्वांच्या समोर ठेवता आले पाहिजेत. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारला मदतच होईल. आम्हालाही अशी आशा आहे की तुम्हीसुद्धा लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर कराल. ज्यामुळे समाजातील नामवंत व्यक्तीची 'मन की बात'चे रुपांतर 'मौन की बात'मध्ये होणार नाही, असे शशी थरूर यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

पुण्यात ‘राज’गर्जना, मनसेच्या प्रचारास होणार प्रारंभ