पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुष्मानच्या या चित्रपटामुळे फक्त प्रेक्षकच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील प्रभावित झाले आहे. ट्रम्प यांनी आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट समलैंगिकतेवर आधारित असून समाज हे स्वीकारण्यास अजूनही टाळाटाळ करीत असल्याचे चित्रपटात दाखवले आहे.

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन

खरं तर ब्रिटीश मानवाधिकार कार्यकर्ते पीटर टैटचेल यांनी आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले होते. त्यांनी असे म्हटले आहे की, 'बॉलिवूडचा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर आता या चित्रपटाच्या मदतीने देशातील वयोवृध्द लोकांना समलैंगिकतेबाबत जागरूक करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. व्वा.'

NRC झाल्यास देशातून ८ कोटी मुसलमान बाहेर जातील- ओवेसी

दरम्यान, पीटर टैटचेल यांच्या ट्विटला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केले आणि एका शब्दात या चित्रपटाला 'ग्रेट' असे म्हटले आहे. यानंतर पीटर यांनी ट्रम्प यांच्या ट्विटला रिट्विट केले. 'राष्ट्राध्यक्षांकडून एलजीबीटीच्या मुद्याला गंभीरतेने घेण्याची ही सुरुवात आहे. आणि हा कुठला पीआर स्टंट नसावा अशी मी आशा करतो', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात गुन्हा