पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घटस्फोटासाठीच अभिनेत्रीनं केली घरगुती हिंसाचाराची तक्रार, सासूचा आरोप

अभिनेत्रीची पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पती मुलीला मारहाण करतो तसेच अश्लिल शेरेबाजी करतो असा आरोप अभिनेत्रीचा आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटकही करण्यात आली. मंगळवारी त्याला १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. मात्र अभिनेत्रीला पतीपासून घटस्फोट हवा असल्यानं तिनं खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप अभिनेत्रीच्या सासूनं बॉम्बे टाइम्सशी बोलताना केला आहे. 

अभिनेत्यानं सेटवरील ४०० सदस्यांना भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या

या अभिनेत्रीचं पूर्वी लग्न झालं होतं. मात्र तिनं २००७ साली पतीपासून घटस्फोट घेतला. या जोडप्याला मुलगीही होती. घटस्फोटानंतर या मुलीचा ताबा अभिनेत्रीकडे आला. २०१३ साली तिनं पुन्हा लग्न केलं. मात्र आता तिनं मुलगी सावत्र असल्यानं पती तिला मारहाण करतो असा आरोप केला आहे. या आरोपानंतर अभिनेत्रीच्या सासूनं संताप व्यक्त केला आहे.

'अभिनेत्री आणि तिच्या पतीचे वारंवार खटके उडत आहेत. त्या दोघांचा संसार सुखाचा सुरू राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. दोघांनाही दोन वर्षांचा लहान मुलगाही आहे. दोघांच्या भांडणांचा त्या चिमुकल्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतं. माझ्या मुलानं सावत्र मुलीलाही स्वत:च्या मुलीप्रमाणे वागणूक दिली आहे. दोघींनाही खूश ठेवण्यासाठी तो नेहमीच झटत असतो मात्र तिला घटस्फोट हवा असल्यानं तिनं खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप संबधीत अभिनेत्रीच्या सासूनं केला आहे. 

Video : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत

या प्रकरणात पीडित मुलीनं मौन सोडलं आहे. माझी आई नाही तर मी घरगुती हिंसाचाराची बळी ठरली आहे. सावत्र वडिलांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला नाही, या बातम्या खोट्या आहेत मात्र अनेकदा त्यांनी माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी ऐकून कोणत्याही आईचं मन दुखावेल असं पीडित मुलीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.