पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

The Lion King : श्रेयस तळपदे देणार या कार्टुन कॅरेक्टरला आवाज

श्रेयस तळपदे

वॉल्ट डिस्नेचा जगप्रसिद्ध अॅनिमेटेड चित्रपट 'दी लायन किंग'चा  रिमेक येत आहे. 'दी लायन किंग' हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदीतही जुलै महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील कार्टुन कॅरेक्टर्सनां बॉलिवूड चित्रपटसृष्टीतले अनेक बडे कलाकार  आवाज देणार आहेत. चित्रपटाचं डबिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटातील प्रमुख पात्र 'मुफासा' आणि 'सिम्बा'साठी शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान आवाज देत आहेत. 

तर श्रेयस तळपदे हा टिमॉन या कार्टुन कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहे. टिमॉन  हा 'सिम्बा'चा जवळचा मित्र दाखवण्यात आला आहे. '१२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ओम शांती ओम चित्रपटात मी शाहरूखचा मित्र होतो. आता मी दी लायन किंगमध्ये शाहरूखच्या मुलाचा  मित्र असणार आहे' असं ट्विट करत श्रेयसनं आनंद व्यक्त केला आहे. 

या व्यतिरिक्त आशिष विद्यार्थी 'स्कार', संजय मिश्रा 'फुम्बा', असरानी 'झाझु' या कार्टुन कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहेत. १९९४ साली 'दी लायन किंग' अॅनिमेटड चित्रपट प्रदर्शित झाला. बच्चेकंपनीचा हा सर्वात आवडता चित्रपट ठरला. त्यानंतर 'सिम्बा' नावानं याच कथानकावर कार्टुन सीरिजही आली ती देखील बच्चेकंपनीची सर्वात लोकप्रिय कार्टुन सीरिज ठरली. आता तब्बल २५ वर्षांनंतर 'दी लायन किंग'चा थ्रीडी रिमेक येत आहे. 

१९ जुलैला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. भारतात हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू या भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.