पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक

तारक मेहता का उल्टा चष्मा

गेल्या दोन वर्षांपासून हो- नाही करत अखेर 'दयाबेन' ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत  परतणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे.  सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. या गोष्टीला आता दोन वर्षे  उलटली. दिशाच्या लाखो चाहत्यांना तिच्या परतीची अपेक्षा होती. अखेर ती मालिकेत परतणार आहे याबद्दल मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सकारात्मकता व्यक्त केली आहे.

कंगनाच्या पहिल्या 'किस'चा किस्सा अन् बरच काही

''दिशा मालिकेत परतणार याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. कदाचित एक महिन्याचा कालावधी याला लागू शकतो.  गेल्या काही महिन्यांपासून आम्ही तिच्या परतण्याची वाट पाहत होतो, मात्र त्यावेळी तिनं आम्हाला होकार दिला नव्हता. माझी मुलगी खूप लहान आहे तिला एकटं कसं सोडू?, असं उत्तर तिनं आम्हाला दिलं होतं. मात्र आता मालिकेत परण्याचा तिचा विचार पक्का झाला असं दिसतंय'', अशी सकारात्मक प्रतिक्रिया असित यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे. 

''मालिकेचे निर्माते आणि दिशा यांच्यामधील नातं हे चांगलं आहे. निर्माती संस्था आणि दिशा यांच्यामध्ये यापूर्वी कधीही वाद नव्हता. तिनं मालिकेत परतावं एवढीच आमची अपेक्षा होती. तिच्याविना कथानक पुढे रेटून आता आम्हीही दमलो ती परत यावी एवढीच आमची इच्छा आहे'', असं असित म्हणाले. 

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

२०१५ साली दिशानं व्यावसायिक मयूर पांड्या याच्यासोबत विवाहगाठ बांधली. नोव्हेंबर २०१७ साली तिनं मुलीला जन्म झाला. सप्टेंबर २०१७ पासून ती प्रसुती रजेवर होती. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Disha Vakani return as Dayaben confirmed by Taarak Mehta Ka Ooltah Chashmah shows makers