पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘तारक मेहता..' मध्ये दिशा परतण्याची शक्यता पूर्णपणे मावळली?

दिशा वकानी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी, मालिकेत कमबॅक करणार  असल्याची शक्यता पूर्णपणे मावळली असल्याचं म्हटलं जात आहे. 'टेलीचक्कर'च्या माहितीनुसार दिशाच्या मागण्या निर्मात्यांना मान्य होत नसल्यानं  ती या शोमध्ये परतणार नसल्याचं म्हटलं जात आहे. 

'बिग बॉस'च्या घराबाहेर काढण्यासाठी राजकीय कट रचला, बिचुकलेंचा आरोप

सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ तिची वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही दिशाला  निर्मात्यांनी ३० दिवसांचा अल्टिमेटमसु्द्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. 

'लाल सिंग चड्ढा'साठी करिनाचा आमिरला होकार

मात्र मे महिन्यात ती परतणार असल्याच्या चर्चांना उढाण आलं. पण दिशाच्या मागण्या आता मान्य होत नसल्यानं ती परतण्याची शक्यता मावळली असल्याचं टेलीचक्करनं म्हटलं आहे. आता दिशाऐवजी  अमी त्रिवेदीची वर्णी लागणार अशा चर्चा आहेत. मात्र मला दयाबेनच्या भूमिकेसाठी अद्यापही विचारण्यात आलं नसल्याचं अमीनं मिड डे सोबत साधलेल्या संवादात म्हटलं आहे.