पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दयाबेनच्या कमबॅकमध्ये आणखी एक वळण, मालिकेत परतणार पण....

दयाबेन

 'दयाबेन' ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत  परतणार हे जवळजवळ  निश्चित झालं आहे. त्यामुळे दिशाचे चाहते आनंदी होते, मात्र हा आनंद फार काळ टिकणार नाही असंच दिसतंय. दिशा वकानीचे पती व्यावसायिक मयूर पांड्यानं तिच्या कमबॅक संदर्भात नवा खुलासा केला आहे. 

दिशा मालिकेत पूर्णवेळ नसेल असं मयूर यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एका प्रोमो शेअर करण्यात आला होता. ज्याद्वारे दयाबेनच्या वापसीचे संकेत दिले होते. 

...म्हणून स्वत:च्या लग्नात राधिकानं नेसली आजीची फाटलेली साडी

दयानं या भागाचं चित्रीकरणही केलं आहे. मात्र ती मालिकेत पूर्णवेळ काम करणार नाही. यासंदर्भात आमची मालिकेच्या निर्मात्यांशी चर्चा सुरु आहे. लवकरच यावर तोडगा काढू असं  मयूर म्हणाले. दिशाला मालिकेत पूर्णवेळ काम करायचं नाहीये असंच मयूर यांनी सुचवलं आहे. 

सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. या गोष्टीला आता दोन वर्षे  उलटली. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी लहान असल्यानं मालिकेला वेळ देऊ शकत नसल्याचंही तिनं सांगितलं होतं. 

कपिल प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, उदित नारायण यांची पोलखोल