पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तारक मेहता'मध्ये परतणार दयाबेन? शेअर केला फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत दयाबेन परतणार की नाही याची उत्सुकता चाहत्यांना आहे. दिशा या मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता दिशानं  तिची सहकलाकार अंजली म्हणजेच नेहा मेहतासोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून ती मालिकेत परतणार असल्याचे तर्क तिच्या चाहत्यांनी बांधले आहेत.  

मिड डेच्या माहितीनुसार १८ मेपासून दिशा मालिकेत परतणार आहे. दिशाला इच्छा  असेल तर ती परत शोमध्ये कमबॅक करू शकते असं सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी मालिकेचे दिग्दर्शक असित मोदींनी  केलं होतं. ही मालिका खूपच सकारात्मक आहे तेव्हा दिशाचा कमबॅक करण्याचा विचारही सकारात्मक असेल असं असित म्हणाले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Daya with Anjali 💗

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. स्पॉट बॉयच्या माहितीनुसार दिशानं एका एपिसोडसाठी १.५० लाखांचं मानधन मागितलं आहे. तिला पूर्वी १.२५ लाखांचं मानधन मिळत होतं. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. 

तिच्या अटी निर्मात्यांनी मान्य केल्या असल्याचं समजत आहे. त्यामुळे दिशाला पुन्हा  एकदा पडद्यावर पाहण्यासाठी तिचा  चाहतावर्ग  खूपच उत्सुक आहे.