पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये दयाबेन परतणार?

दिशा वकानी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. दिशाला इच्छा  असेल तर ती परत शोमध्ये कमबॅक करू शकते असं सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी मालिकेचे दिग्दर्शक असित मोदींनी  केलं होतं. आता दिशा मालिकेत कमबॅक करणार असल्याच्या चर्चा मनोरंजन विश्वात रंगू लागल्या आहेत. दिशा प्रोडक्शन हाऊसमधल्या व्यक्तींच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जात आहे. 

 सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसु्द्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. अखेर दिशाची गच्छंती करण्यात आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. इतकंच नाही तर नव्या दयाबेनसाठी  शोधाशोधही सुरू झाली होती.  

मात्र आता दिशा मालिकेत परतण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त स्पॉटबॉयनं दिलं आहे.  संबधित  संकेतस्थळाच्या माहितीनुसार दिशा प्रोडक्शन हाऊस  नीला टेलिफिल्मच्या संपर्कात आहे. मालिकेत कमबॅक करण्याचा तिचा विचार असल्याचं म्हटलं जात आहे. दिशाचा चाहतावर्ग तिच्या कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे.