पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी नागराज मंजुळेंची ५ लाखांची मदत

नागराज मंजुळे

कोल्हापूर, सांगलीमध्ये आलेल्या पूरामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर ओसरला आहे मात्र आता पुरामुळे उद्धवस्त झालेले संसार नव्यानं उभं करण्याचं  मोठं आव्हान स्थानिकांपुढे आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारबरोबरच अनेक कलाकार, समाजसेवक आणि महाराष्ट्रातील जनताही पुढे आली आहे. 

...म्हणून अभिनेता आमिर खानचे पंतप्रधानांनी मानले आभार

अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत पाठवली आहे. दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी देखील पुरग्रस्तांसाठी मतनिधी पाठवला आहे. पुरग्रस्तांसाठी  नागराज मंजुळे यांनी ५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागराज मंजुळेंचे आभार मानले आहेत. 

यापूर्वी मराठी सिने आणि नाट्य कलाकारही पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. आर्थिक मदतीबरोबरच, धान्य, जीवनावश्यक वस्तूची मदतही त्यांनी पूरग्रस्तांना केली आहे. सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांसारख्या असंख्य कलाकारांनी मदत केली आहे. 

बिग बॉस मराठी : या कारणासाठी परागचा आहे किशोरीताईंनाच पाठिंबा

बॉलिवूडमध्ये आमिर खाननं पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी देखील २५ लाखांची मदत पूरग्रस्तांसाठी केली आहे. कपिल शर्मा, अक्षय कुमारनंही पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचं आवाहन  देशवासीयांना केलं आहे.