पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकसोबत अक्षयही दिसणार, दिग्दर्शकांचा दुजोरा

भूल भुलैया २

'भूल भुलैया २' ची काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा झाली.  १३ वर्षांनंतर अक्षय आणि  विद्या बालनच्या या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल येत आहे. सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारही या चित्रपटात दिसणार आहे.

अक्षयसाठी भूमिका लिहिण्याचं काम सुरू आहे. चित्रपटातील अक्षयची भूमिका ही भूल भुलैया चित्रपटाशीच संबधित असणार आहे. लेखक फरहाद सामजी आणि आकाश कौशिक भूमिका लिहिण्याचं काम करत आहेत. मी अक्षयसोबत सिंग इज किंग आणि वेलकम चित्रपटात काम केलं आहे. भूल भुलैया २ च्या निमित्तानं अक्षयसोबत पुन्हा एकदा काम करायला मला आवडेल. त्याला ही भूमिका आवडेल आणि तो होकार देईन अशी मी आशा करतो असं  दिग्दर्शक अनीज बज्मी मिड डेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. 

२२ दिवस झाले सासू सासऱ्यांशी संपर्क नाही, कलम ३७० वरून उर्मिला मातोंडकर यांची सरकारवर टीका

३१ जुलै २०२० रोजी 'भूल भुलैया २'  प्रदर्शित  होत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख  भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतलं सुशिक्षित जोडपं सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परततं. या घरातील बंद खोलीत  भूतकाळातील कटु आठवणी बंद असतात. या आठवणीतून सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला  होता.

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा 

अक्षयनं  'भूल भुलैया २' मध्ये   साकारलेला मानसोपचारतज्ज्ञ सर्वांनाच आवडला होता. त्यामुळे आता या चित्रपटात कार्तिकची  भूमिका काय असणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Director Anees Bazmee confirms that Bhool Bhulaiyaa 2 has a character specially written for Akshay Kumar