पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा'च्या सेटवर मोबाइलवर घालणार बंदी

आमिर खान

आमिरच्या बहुचर्चित अशा 'लाल सिंह चड्ढा'च्या चित्रीकरणाला पुढील महिन्यात सुरूवात होणार आहे. सध्या कलाकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. तिथे मोबाइलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याचं समजत आहे. कार्यशाळेबरोबरच आता सेटवरही मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. 

विमानतळावरून सामान वाहून नेणाऱ्या साराच्या साधेपणाचं कौतुक

'लाल सिंह चड्ढा'चे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी सेटवर मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती E24 नं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. आमिरनं आपल्या ५४ व्या वाढदिवशी चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'द फॉरेस्ट ग्रम्प'चा रिमेक आहे. 

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी बाहुबली फेम अभिनेता मधू प्रकाशला अटक, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

या चित्रपटाची कथा अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे. या चित्रपटात आमिरबरोबरच अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत असल्याचं समजत आहे. आमिरनं या चित्रपटाबद्दल खूपच गुप्तता पाळणं पसंत केलं आहे. या चित्रपटातील कोणतीही गोष्ट ऑनलाइन लीक होऊ नये  यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सलमानच्या 'दबंग ३' च्या सेटवरही मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती.