पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हॉलिवूड चित्रपटात झळकणार डिंपल कपाडिया

डिंपल कपाडिया

 ख्रिस्तोफर नोलान हे  हॉलिवूडमधल्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. 'बॅटमॅन वर्सेस सुपर हिरो', 'डंकर्क', 'द प्रेस्टिज' ‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केली आहे. या जगप्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी डिंपल कपाडिया यांना मिळाली आहे.

ख्रिस्तोफर यांच्या आगामी 'टेनेट' चित्रपटात डिंपल काम करणार आहेत. ‘टेनेट’ हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी जगातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने स्विकारली आहे. या चित्रपटासाठी डिंपल यांनी रितसर ऑडिशन दिलं. डिंपल या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ऑडिशनपूर्वी  नोलन आणि कास्टिंग डायरेक्टरनं त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या काही चित्रफिती पाहिल्या होत्या. नंतर डिंपल यांची ‘टेनेट’ साठी ऑडिशनही घेण्यात आली, अशी माहिती डिंपलच्या टॅलेंट मॅनेजर   पुर्वी यांनी मिड डेशी बोलताना दिली.

‘टेनेट’ या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. नोलान  हे आपल्या चित्रपटाची कथा चित्रीकरण सुरू व्हायच्या शेवटच्या क्षणापर्यंत गुपितच ठेवणं पसंत करतात त्यामुळे डिंपल यांच्या भूमिकेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dimple Kapadia has landed the role of a lifetime in filmmaker Christopher Nolan upcoming film