मालिका, चित्रीकरण, जाहिराती, वेबसीरिज असं सर्वच प्रकारचं चित्रीकरण गेल्या १९ मार्चपासून बंद आहे. त्यामुळे एरव्ही चित्रीकरणात पूर्णपणे व्यग्र असणारे कलाकार सध्या घरीच आहेत. घरी असणारे बॉलिवूड कलाकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत आहेत. काहींनी तर घरीच वर्कआउट करत असल्याचे व्हिडीओही शेअर केले आहेत.
तिसऱ्यांदा कनिका कपूरची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह
मात्र हे व्हिडीओ शेअर करु नका, त्यापेक्षा खाओ पियो ऐश करो मित्रों असा सल्ला दिलजीत दोसांज या पंजाबी अभिनेता, गायकानं बॉलिवूडला दिला आहे. काही दिवस घरीच असल्यानं दीपिका पादुकोन, कतरिना कैफ सारख्या अनेक कलाकारांनी वर्कआउटचे व्हिडीओ शेअर केले आहे.
त्यानंतर दिलजीतनं सोशल मीडियावर एक मीम शेअर केलं आहे ज्यात त्यानं वर्कआउट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करणं बंद करा त्यापेक्षा खाऊन पिऊन मज्जा करा असं लिहिलं आहे.