पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमर- प्रेमशिवाय ‘अंदाज अपना अपना’चा सीक्वल अपूर्णच

अंदाज अपना अपना

‘अंदाज अपना अपना’ हा  बॉलिवूडमधल्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट होय. या चित्रपटाचा  सीक्वल येणार अशा चर्चा वर्षभरापासून आहेत अखेर या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. लेखक दिलीप शुक्ला यांनी ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखती अंदाज अपना अपना’च्या सीक्वलवर काम सुरू असल्याचं सांगितलं. तसेच हा सीक्वल अमर- प्रेम म्हणजेच आमिर सलमानशिवाय अपूर्णच असल्याचही ते म्हणाले. 

रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल

 ‘मी सध्या अंदाज अपना अपनाच्या सीक्वलची कथा लिहित आहे. हे नक्कीच सोपं काम नाही. पूर्वीपेक्षाही अधिक दमदार कथा लिहिण्यावर मी लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र सलमान आणि आमिरशिवाय सीक्वल पूर्ण होणार नाही असं शुक्ला म्हणाले.  चित्रपटात तीन नवीन कलाकार असतील पण त्याचसोबत सलमान आणि आमिर खानही पहायला मिळतील असं शुक्ला म्हणाले. त्यामुळे जवळपास २५ वर्षांनंतर ‘अंदाज अपना अपना’चा  सीक्वल येणार आणि त्यात लाडकी जोडी पहायला मिळणार ही नक्कीच चाहत्यांसाठी आनंदाची बाब असणार आहे. 

'वयानं लहान जोडीदार निवडणाऱ्या स्त्रिला म्हातारी म्हणून हिणवतात'

१९९४ साली ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट आला होता. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल, शक्ती कपूर सारखे कलाकारही होते.