पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सख्ख्या नात्याहून अधिक घट्ट आहे लतादीदी- दिलीप कुमारांचं नातं

दिलीप कुमार - लतादीदी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज ९७ वा वाढदिवस.  मुगले- ए- आजम,  देवदास, दीदार, अंदाज, शक्ती, सौदागर अशा असंख्य चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे दिलीप कुमार बॉलिवूडचे 'ट्रॅजेडी किंग' म्हणूनही ओळखले  जातात. आपल्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी ट्विट करत सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आजारपणानं ग्रासल्यानं दिलीप कुमार हे घरीच आहेत. सध्या बॉलिवूडशी तसा फारसा संबध नसला तरी इथल्या काही कलाकारांसोबत दिलीप कुमार यांचे नातं सख्ख्या नात्याहूनही अधिक घट्ट आहे. त्यातलं एक नातं म्हणजेचं लतादीदींसोबतचं होय. लतादीदींना ते आपल्या लहान बहिणीसमान मानतात. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत लतादीदींना तब्येतीची काळजी घेण्याची विनंतीही केली होती.

महाराष्ट्रातल्या या ठिकाणी होणार 'पावनखिंड'चं चित्रीकरण

गेल्या महिन्यात लतादीदींना न्यूमोनिया झाला होता. त्या काही दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होत्या. काही आठवड्यांच्या उपचारांनंतर घरी परतलेल्या लतादीदींसाठी दिलीप कुमार यांनी ट्विट केलं होतं. माझी छोटी बहिण लता आजारपणातून बरी होऊन घरी परतली याचा आनंद झाला. असं ट्विट दिलीप कुमार यांनी केलं होतं. बॉलिवूडमध्ये लतादीदी आणि दिलीप कुमार यांचे संबंध सख्ख्या बहिण भावाहूनही अधिक घट्ट असल्याचं अनेकांना माहिती होतं आणि याला कारणीभूत ठरला होता एक जूना प्रसंग.

लतादीदींनी हिंदी, मराठी, गुजराती अशा विविध भाषेत  गाणी गायली. त्याकाळी हिंदी चित्रपटातील अनेक गाणी ही उर्दू मिश्रित होती. तो लतादींदीचा उदयाचा काळ होता. लतादीदींच्या आवाजाची मोहिनी श्रोत्यांना, रसिक प्रेक्षकांना पडली होती. अनेक चित्रपटांना लतादीदींच्या आवाजातील गाणीच होती. दिग्दर्शक लतादीदींच्या घरी रेकॉर्डिंगच्या तारखा मिळवण्यासाठी येत. यशाच्या सर्वोच्च शिखराची एक पायरी लतादीदींनी सर केली होती.

माझा वाढदिवस साजरा करू नका, चाहत्यांना रजनीकांत यांची विनंती

मात्र, त्यावेळी लतादीदींइतकेच किंबहुना त्यांच्याहूनही प्रसिद्ध असलेले नट दिलीप कुमार यांना लतादीदींच्या गाण्यात एक बाब खटकली होती. लतादीदींच्या गाण्यांवर त्यांनी टिप्पणी केली. 'वोह गाती तो बढिया है. लेकिन उसके गानों मे मराठी दालभात की बूँ आती है', असं ते म्हणाले होते. लतादीदींचे उर्दू उच्चार हे त्यावेळी स्पष्ट नव्हते, ते उर्दूपेक्षा मराठी अधिक वाटतात असं दिलीप कुमार यांना म्हणायचं होतं.
ही गोष्ट लतादीदींना समजली होती. दिलीप कुमार हे मोठे नट होते पण ऊर्दूवरची त्यांची पकड जबरदस्त होती हे सर्वांनाच माहिती होते. मात्र, त्यांच्या टिप्पणीनं चिडून न जाता लतादीदींनी उर्दू शिकण्याचा निश्चय केला.

मेहबूब नावाच्या शिक्षकांकडून लतादीदी उर्दू शिकल्या. त्या टीकेतूनही त्यांनी बोध घेत स्वत:मध्ये सुधारणा केल्या. त्यानंतर लतादींदीनी अनेक उर्दूमिश्रीत गाणी गायली. खुद्द दिलीप कुमारही याबदलापासून प्रभावित झाले. कदाचित ही टिप्पणी ऐकून लतादीदी आणि दिलीप कुमार या दोघांमध्ये दुरावा येईल असं अनेकांना वाटत होतं. मात्र झालं उलटचं. दिलीप कुमार लतादीदींना लहान बहिण मानू लागले. लहान बहिणीप्रमाणे लतादींदीना जपू लागले. त्यानंतर दिलीप कुमार यांच्या हट्टाखातर लतादीदी एका चित्रपटात त्यांच्यासोबत 'काहे जिया जाय' हे गाणंही गायल्या होत्या.  

लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती

वाढत्या वयामुळे अनेक आठवणी विस्मृतीत गेल्या असल्या तरी एके दिवशी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लतादींदी दिलीप कुमारांच्या घरी गेल्या होत्या. कदाचित दिलीप कुमार दीदींना ओळखू शकणार नाही अशी भीती सायरा बानोंना होती. मात्र, लतादीदींना पाहताच दिलीपजी 'काहे जिया जाय' हे गाणं गुणगुणू लागले. या प्रसंगाचा उल्लेख लतादीदींच्या बहिण मीना मंगेशकर-खडीकर यांच्या 'मोठी तिची सावली' या पुस्तकात आहे. लतादीदींचे बालपणीचे दिवस, संघर्षाच्या आणि यशाच्या काळातील अनेक दुर्मिळ आठवणींचा लेखाजोखा यात मांडला आहे.