पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जंगजौहर : बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा

जंगजौहर

'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांना मिळालेल्या भरघोस यशानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर  तिसरा चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांनी नुकतीच आपल्या 'जंगजौहर' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी लाखो मावळे महाराजांसोबत प्राणपणानं लढले, कित्येकांनी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केलं. अशा स्वराज्याच्या शूर योद्धांची कथा रुपेरी पडद्यावर साकरण्याचं शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर  यांनी पेललं आहे.  

जाणून घ्या 'पानिपत'ची एकूण कमाई

'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन्ही चित्रपटांना मराठी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण अर्पण करणाऱ्या बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा 'जंगजौहर' या  आगामी चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अर्थात या चित्रपटातही फर्जंद आणि फत्तेशिकस्तमधले अनेक कलाकार पाहायला मिळणार हे नक्की.  

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मधून ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

सिद्धीच्या वेढ्यातून निसटल्यानंतर महाराज विशाळगाडपर्यंत पोहचेपर्यंत बाजीप्रभू आणि बांदल सेनेनं घोडखिंड लढवली. महाराज विशाळगाडावर सुखरूप पोहचल्याची तोफ कानी पडत नाही तोपर्यंत बाजीप्रभू आणि बांदल सेने प्राण पणाला लावून खिंड लढवली. शत्रूला घोडखिंड ओलांडू दिली नाही. बाजीप्रभूंच्या बलिदानानं घोडखिंड 'पावन' झाली. त्याच्या स्वराज्यनिष्ठेची बलिदानाची कथा रुपेरी पडद्यावर  महाराष्ट्रास पहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी चित्रपटाची घोषणा केली विशेष म्हणजे पुढीलवर्षी बाजीप्रभूंवर आधारित 'पावनखिंड' हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे. 

सख्ख्या नात्याहून अधिक घट्ट आहे लतादीदी- दिलीप कुमारांचं नातं