पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्रीच्या भेटीचं आमिष दाखवून चाहत्याला ६० लाखांचा गंडा

काजल अग्रवाल

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालशी भेट घडवून देतो असं सांगून, तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या चाहत्याला ६० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

या मराठी कलाकाराच्या अभिनयानं प्रभावित झाली परिणीती चोप्रा

डीएनएच्या वृत्तानुसार तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे राहणाऱ्या काजल अग्रवालच्या चाहत्याकडून ऑनलाइन पैसे उकळण्यात आले. सुरूवातीला या चाहत्यानं ५० हजार रुपये  आणि खासगी माहिती संबधीत व्यक्तीला दिली. त्यानंतर तीनदा  या चाहत्यांनं  रक्कम भरली,  एकूण रक्कम  ही  ६० लाख रुपये होती.  मात्र पैसे भरल्यानंतरही  भेट न झाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं या चाहत्याच्या लक्षात आलं. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

 नैराश्य आल्यानं या चाहत्यानं घरातून पळ काढला, कोलकात्यामध्ये हा चाहता पोलिसांना सापडला. पोलिस चौकशीअंतर्गत फसवणूक केलेल्या व्यक्तीचं नाव श्रवणकुमार असल्याचं समोर आलं. श्रवणकुमारनं आपण निर्माता असल्याचं भासवून चाहत्याकडून ६० लाख रुपये उकळले.  पोलिसांनी श्रवणकुमारला अटक केली आहे.