पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी 'दीदी और मैं' पुस्तकाचे होणार प्रकाशन

लता मंगेशकर आणि मीना मंगेशकर

भारतरत्न लता मंगेशकर यांचा येत्या २८ सप्टेंबरला ९० वा वाढदिवस आहे. लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहीण आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर यांनी लिहिलेल्या 'दीदी और मै' या पुरस्ताकाचे प्रकाशन होणार आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांच्याच हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. 

'आयुष्यात मला पराभव माहीत नाही, राजू शेट्टींनी विचार करुन बोलावं'

मीना मंगेशकर यांचे 'मोठी तिची सावली' हे आत्मवृत्त मागच्या वर्षी प्रकाशित झाले होते. या पुस्तकाला खूप प्रसिध्दी मिळाल्यानंतर हेच पुस्तक आता हिंदीमध्ये सुध्दा आले आहे.  'दीदी और मै' या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लिहिली आहे तर सुप्रसिध्द पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी मूळ मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे. 

दिवाळीपूर्वीच राज्यात नवं सरकार सत्तेत

'दीदी और मैं' या पुस्तकात मीना मंगेशकर यांनी लतादीदींच्या उज्ज्वल कारकीर्दीचा समग्र आलेख आपल्या रसाळ शैलीत मांडला आहे. लतादीदींशी निगडित अनेक अविस्मरणीय आठवणी आणि मंगेशकर कुटुंबाची दुर्मीळ छायाचित्रं असं या पुस्तकाचे स्वरुप आहे. मंगेशकर भावंडांचे सांगली, पुणे आणि कोल्हापुरातले बालपणीचे दिवस. लतादीदींचा सुरूवातीच्या दिवसांतला संघर्ष, त्यांना मिळालेली संगीताची तालीम, आणि नंतरचं झगझगीत यश-पर्व, दीदींचे परदेशी दौरे, मंगेशकर कुटुंबाचा प्रवास, दीदींच्या आवडी-निवडी, त्यांचे स्नेही नि सुहृद अशा तपशिलांमुळे हे पुस्तक रसप्रद झाले आहे.

'महाराष्ट्रानं मला भरभरून दिलं, आता कोणतीही इच्छा नाही'

लतादीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा शुभयोग साधून 'दीदी और मैं' प्रकाशित होत आहे याचा मला अतिशय आनंद असल्याचे मत मीनाताईंनी व्यक्त केले आहे. हे पुस्तक म्हणजे मी दीदीला दिलेली प्रेमाची मौल्यवान भेट आहे. हिंदी अनुवादामुळे आता हे पुस्तक देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लातदीदींच्या बहीण मीनाताई यांनी 'माणसाला पंख असतात', 'शाबाश सुनबाई', 'रथ जगन्नाथाचा', 'कानून का शिकार' अशा मोजक्या मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसंच त्यांनी लतादीदींसोबत गाणी सुध्दा गायली आहेत. 

KBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल