पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सनीचा मोबाइल नंबर समजून दिल्लीस्थित तरुणाला फोन करून केलं हैराण

सनी लिओनी

दिल्लीस्थित २६ वर्षांचा व्यावसायिक गेल्या चार-पाच दिवसांपासून हैराण आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा फोन क्रमांक समजून जगभरातून त्याला जवळपास ५०० फोन कॉल्स आले आहेत. या नको असलेल्या फोन कॉल्समुळे हैराण झालेल्या पुनित अग्रवालनं दिल्ली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

गेल्या आठवड्यात सनीची भूमिका असलेला 'अर्जुन पटियाला' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एका दृश्यात सनी चित्रपटाचा नायक दिलजितला स्वत:चा मोबाइल क्रमांक देते, असं दाखवण्यात आलं आहे. चित्रपट पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह केला. चित्रपटात सनीनं सांगितलेला क्रमांक तिचाच आहे असं वाटल्यानं शेकडो लोकांनी या क्रमांकावर फोनही करून पाहिला. हा क्रमांक प्रत्यक्षात पुनित अग्रवाल या व्यावसायिकाचा होता. 

..म्हणून गोविंदानं नाकारली 'अवतार' चित्रपटाची ऑफर

भारतासह, इंडोनेशिया, न्यूझीलंडसारख्या देशांतूनही गेल्या तीन चार दिवसांपासून सतत फोन येत आहेत. हा फोन क्रमांक सनीचा आहे असं अनेकांना वाटत आहे, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ५०० हून अधिक कॉल्स आले आहेत, सतत येत असलेल्या कॉल्समुळे मी हैराण झालो असून मी झोपूही शकलो नाही असं पुनितनं 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.  

'बिग बॉसच्या घरात किशोरीताईंवर खूप इमोशनल अत्याचार झाले'

पुनित गेल्या १२ वर्षांपासून हा फोन क्रमांक वापरत आहे. हा क्रमांक बंद केला तर माझ्या व्यवसायाचं नुकसान होईन अशी काळजी त्यानं व्यक्त केली आहे.