पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, ट्विटरवर मीम्सचा पूर!

ढिंच्याक पूजा (संग्रहित छायाचित्र)

आपल्या वेगळ्या स्वरुपातील गाण्यांमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेली ढिंच्याक पूजा सोमवारी पुन्हा एकदा देशात ट्रेंडिंगमध्ये आहे. ढिंच्याक पूजाचे एक नवे गाणे गेल्या गुरुवारी युट्यूबवर अपलोड करण्यात आले. हे गाणे युट्यूबवर देशात चौथ्या क्रमांकावर ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटिझन्सनी ट्विटरवर वेगवेगळे मीम्स टाकून ढिंच्याक पूजाला ट्रोल केले आहे.

पागल हो के नाचो, नाच के पागल हो जाओ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. त्यावरून नेटिझन्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ढिंच्याक पूजा या युट्यूब चॅनेलचे साडेचार लाखांपेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत.