पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीची मागितली माफी

धर्मेंद्र

हेमा मालिनी यांच्या झाडू मारण्याच्या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देणाऱ्या धर्मेंद्र यांनी अखेर माफी मागितली आहे. मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं धर्मेंद्र म्हणाले. त्यांनी एक जुना फोटोही शेअर केला. 

स्वच्छतेविषयी जनजागृती करणाऱ्या हेमा मालिनी या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेत्री हेमा मालिनी या दोघांनी संसदेच्या परिसरात झाडू मारून स्वच्छतेचा  संदेश दिला. मात्र झाडू मारण्याचा केवळ दिखावा करणाऱ्या हेमा मालिनी सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या.

यावरून एका युजर्सनं हेमा मालिनीं यांना ट्रोल केलं.  मॅडमनं आयुष्यात कधी झाडू हातात घेतली का? असा प्रश्न एका युजर्सनं  हेमा मालिनींचें पती धर्मेंद्र यांना विचारला. यावर धर्मेंद्र यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. 'फक्त चित्रपटात तिनं झाडूला हात लावला आहे. ती खूपच अनाडी दिसतेय. मात्र मला खूप चांगल्याप्रकारे केर काढता येतो. मी लहानपणापासूनच आईला मदत करायचो. मला स्वच्छता आवडते', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. 

या प्रतिक्रियेनंतर  धर्मेंद्र यांनी ट्विटरवर आपला जुना फोटो शेअर करत माफी मागितली आहे. मी काहीतरी वेगळं म्हटलं पण मित्रांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला. जे काही मी म्हणालो ते आता पुन्हा   कधीच म्हणणार नाही असंही धर्मेंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं.