पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धर्मेंद्र यांचे नवे He Man रेस्तराँ महापालिकेकडून सील

अभिनेता धर्मेंद्र

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 'व्हॅलेंटाईन डे'ला हरयाणातील कर्नाल येथे आपले नवीन रेस्तराँ सुरु केले होते. या रेस्तराँचे नाव त्यांनी He Man ठेवले होते. परंतु, आता हे रेस्तराँ सील केल्याचे वृत्त हाती आले आहे. हे रेस्तराँ बेकायदा बांधकामामुळे सील करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कर्नाल महानगरपालिकेने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. महानगरपालिकेचे अधिकारी रेस्तराँत आल्यानंतर त्यांनी रेस्तराँचे कर्मचारी आणि ग्राहकांना बाहेर काढले आणि त्यानंतर रेस्तराँवर नोटीस लावली. 

सिद्धार्थ शुक्ला शहनाज गिलशी लग्न करणार, दिले हे संकेत

या कारवाईबाबत बोलताना महानगरपालिकेचे उपायुक्त निशांतकुमार यादव म्हणाले की, बेकायदा बांधकामामुळे आम्ही गेल्यावर्षी अनेक बांधकाम मालकांना नोटीस बजावली होती. परंतु, एकाचेही त्या नोटीशीला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली. 

धर्मेंद्र यांनी स्वतः या रेस्तराँचे उद्घाटन केले होते. या रेस्तराँचे उद्घाटन करताना धर्मेंद्र म्हणाले होते की, प्रिय मित्रांनो, माझा रेस्तराँ 'गरम धरम ढाबा'च्या यशानंतर आता आम्ही लोकांच्या शेतातून थेट तुमच्या टेबलवर जेवण आणणारी कॉन्सेप्ट असणारे रेस्तराँ 'ही मॅन'ची सुरुवात करत आहोत. मी तुमचे प्रेम आणि सन्मानाचा मनापासून आदर करतो.

कुशल बद्रिके 'या' चित्रपटात दिसणार डॉनच्या भूमिकेत

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र हे चित्रपटांपासून दूर आहेत. ते सध्या आपल्या फार्म हाऊसवर राहत आहेत. त्यांनी 'यमला पगला दिवाना' या चित्रपटात शेवटची भूमिका निभावली होती. या चित्रपटात त्यांच्याबरोबर मुलगा सनी आणि बॉबी देओल यांनीही काम केले होते. 

सनी देओल यांचा मुलगा करण याच्या बॉलिवूड लॉचिंग चित्रपट 'पल पल दिल के पास' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

कोरोनामुळे मार्च महिन्यात होणारा आयफा सोहळा रद्द