पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेमा मालिनींना झाडू मारताना पाहून धर्मेंद्र यांची भन्नाट प्रतिक्रिया

हेमा मालिनी

स्वच्छतेविषयी जनजागृती करणाऱ्या हेमा मालिनी या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेत्री हेमा मालिनी या दोघांनी संसदेच्या परिसरात झाडू मारून स्वच्छतेचा  संदेश दिला. मात्र झाडू मारण्याचा केवळ दिखावा करणाऱ्या हेमा मालिनी सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या. त्यांच्या व्हायरल व्हिडीओवर पती धर्मेंद्रनींही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

एका युजर्सनं हेमा मालिनीं यांना ट्रोल केलं.  मॅडमनं आयुष्यात कधी झाडू हातात घेतली का? असा प्रश्न एका युजर्सनं  हेमा मालिनींचें पती धर्मेंद्र यांना विचारला. यावर धर्मेंद्र यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. 'फक्त चित्रपटात तिनं झाडूला हात लावला आहे. ती खूपच अनाडी दिसतेय. मात्र मला खूप चांगल्याप्रकारे केर काढता येतो. मी लहानपणापासूनच आईला मदत करायचो. मला स्वच्छता आवडते', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात  व्हायरल झालेला हा व्हिडीओ मीम्सचा विषय बनला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हेमा यांची खिल्ली उडवली आहे.