पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जान्हवीनं घेतली 'आर्ची'ची भेट

रिंकू राजगुरू- जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूची भेट घेतली. दोघींनी  आपल्या सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

दीपिका- रणबीरची जोडी पुन्हा दिसणार एकत्र ?

 रिंकूनं 'सैराट'मधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हा चित्रपट २०१६ मधला सुपरहिट चित्रपट ठरला. चित्रपटानं अनेक विक्रम आपल्या नावे केले. या चित्रपटातून नवोदीत  रिंकू राजगुरू तुफान लोकप्रिय झाली. तिला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कर देखील मिळाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

💕

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

त्यानंतर बॉलिवूडमध्ये या चित्रपटाचा रिमेकही आला. तो 'धडक' या नावानं २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीनं आपल्या पदार्पणासाठी 'धडक' ची निवड केली. श्रीदेवी आणि जान्हवीनं हा चित्रपट पाहिला होता. चित्रपटाची कथा, त्यातील  रिंकूची भूमिका दोघींना भावली होती. 

झी मराठी अवॉर्ड्स : या मालिकेनं यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मारली बाजी

रिंकूनं साकारलेली 'आर्ची' साकारण्याचं मोठं आव्हान जान्हवीपुढे होते. रिंकूनं जी व्यतिरेखा साकारली ती आव्हानात्मक होती इतक्या सुंदरपणे ती कोणीही साकारू शकत नाही, असं कौतुकही जान्हवीनं केलं होतं.