नेपाळी वंशाचा अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनं दिग्दर्शक करण जोहरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा नाकारल्या आहेत. करणविषयी माझ्या मनात खूप आदर आहे, तो माझा गुरू आहे, मला तो मोठ्या भावाच्या स्थानी आहे असं प्रबल म्हणाला.
करण जोहरच्या वाढदिवशी प्रबलनं इन्स्टाग्रामवर करणसोबतचा फोटो पोस्ट करत करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या शुभेच्छा देताना त्यानं 'प्यार किया तो डरना क्या' असं लिहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या पोस्टनंतर करण आणि प्रबल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या चर्चांमुळे दुखावलेल्या प्रबलनं ट्विटरवर स्पष्टीकरण देत करणसोबत अफेअर असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
No, I am not dating @karanjohar He is my dearest friend, mentor, buddy and a big brother. Pls. Kindly read the attachement with my statement and hopefully we can lay it all to rest. Wish you all nothing but the best and love XPG pic.twitter.com/I5UQkIt2fx
— Prabal Gurung (@prabalgurung) May 26, 2019
'मी जी पोस्ट केली ती केवळ गंमतीनं केली. मात्र त्यातून मी करणसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा अर्थ काढण्यात आला. तो मला गुरूस्थानी आहे, माझ्यासाठी तो मोठ्या भावासारखा आहे. मी गेल्या पाचवर्षांपासून एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे मात्र तो करण जोहर नाही.
माझं चुकीच्या पद्धतीनं करणसोबत नाव जोडणं हे खूपच दुखद आहे. करणसोबतचं माझं नातं हे मैत्रीचं आहे. त्यामुळे आता एका साचेबद्ध आणि संकुचित नजरेतून आपण प्रेमाकडे पाहणं सोडलं पाहिजे', असं प्रबल म्हणाला.