पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत' चित्रपटाविरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टनं फेटाळली

भारत

भारत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी  आणण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे. 'भारत' या शब्दाचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला आहे तसेच देशाच्या राजमुद्रा आणि नावे (गैरवापर रोखणे) कायद्यातील कलम तीनचे उल्लंघन करण्यात आले त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ही याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. 

सलमानचा 'भारत' चित्रपट या आठड्यात प्रदर्शित होणार आहे. याचिकाकर्त्यानं चित्रपटाच्या नावाबरोबरच चित्रपटाच्या संवादातही बदल करण्याची मागणी केली होती. या चित्रपटात सलमानचं नाव 'भारत' असून 'भारत' या पात्रानं स्वत:च्या नावाची तुलना ही देशाशी केली आहे ज्यामुळे असंख्य देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं यात म्हटलं होतं. मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. 

'भारत' चित्रपटाच्या तिकिटीत दरवाढ नाही, सलमानचं चाहत्यांना गिफ्ट

'भारत' हा चित्रपट कोरियन चित्रपट 'अॅन ओड टु  माय फादर' या चित्रपटावर आधारलेला आहे. ५ जूनला म्हणजे ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.