उत्तर प्रदेशनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 'सांड की आंख' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तापसी पन्नू, भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'सांड की आंख' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला.
कलर्स मराठीच्या पहिल्याच अवॉर्ड सोहळ्यात हे ठरले विजेते
हा चित्रपट दिल्लीत करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. या चित्रपटातून दिलेला संदेश हा सर्व वयाच्या लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. हा चित्रपट प्रत्येकालाच पाहता यावा यासाठी तो करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिल्यांदाच करिनाला 'लाल सिंग चड्ढा'साठी आमिरनं द्यायला लावली ऑडिशन
मार्गात कितीही मोठ्या अडचणी येऊ दे जर तुमच्यामध्ये स्वप्नपूर्तीची जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही, हाच संदेश चित्रपट देतो असंही कौतुक केजरीवाल यांनी केलं आहे. दिल्लीत या चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला होता. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी अरविंद केजरीवाल स्वत: उपस्थित होते.