पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या छपाक सिनेमाची तिकीटे रद्द केल्याचे ते स्क्रिनशॉट किती खरे?

छपाकच्या रद्द केलेल्या तिकीटांचे स्क्रिनशॉट

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांवर गेल्या रविवारी संध्याकाळी अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात येतो आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ जेएनयूतील विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करताहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला होता. पण दीपिकाच्या या कृतीमुळे तिचा याच आठवड्यात प्रदर्शित होत असलेला सिनेमा छपाक अडचणीत आला आहे. #boycottchhapaak हा हॅशटॅग बुधवारपासून ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. आता काही जणांनी यापुढे जाऊन आपण या सिनेमाची आधी बूक केलेली तिकीटे रद्द केली असल्याचे स्क्रिनशॉट ट्विटर आणि इतर सोशल मीडिया वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत. पण ही रद्द केलेली सर्व तिकीटे एकसारखीच असल्यामुळे हा सुद्धा राजकीय रणनितीचाच भाग असल्याचे दिसते आहे.

मध्य रेल्वेची कसारा- कल्याणदरम्यान वाहतूक ठप्प

अनेक प्रेक्षकांकडून या स्वरुपाचे तिकीट रद्द केल्याचे स्क्रिनशॉट ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. #boycottchhapaak हा हॅशटॅगही त्यांच्याकडून वापरला जात असून, इतर प्रेक्षकांनीही हा सिनेमा बघू नये, त्याच्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले जात आहे. पण या ट्विटसोबत असलेले तिकीटांचे स्क्रिनशॉट एकसारखेच आहेत. अनेकांनी हाच फोटो आपल्या हँडलवरून शेअर केला आहे. त्यामुळे त्यांनी नक्की तिकीट काढले होते का, त्यांनी आपले तिकीट रद्द केले आहे का, हे स्पष्ट होत नाही. 

या स्क्रिनशॉटमध्ये दिसते की, वडोदरा येथील सिनेमार्क थिएटरमधील शुक्रवार, १० जानेवारीचे हे तिकीट आहे. संध्याकाळी ६.५० च्या शोचे हे तिकीट आहे. एकूण तीन तिकीटे बूक करण्यात आली होती. त्याचा क्रमांक ए८, ए९ आणि ए१० असा आहे. तिकीट रद्द केल्यामुळे ४२० रुपयांचा परतावा मिळाल्याचेही दिसते. वेगवेगळ्या हँडल्सवरून हाच स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे.  

जेएनयू हल्ला : विद्यार्थ्यांवरील काही हल्लेखोरांची ओळख पटली

गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून विद्यार्थी संघटनांमध्ये उभी फूट पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेएनयूतील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा वातावरण बिघडले आहे.