पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाचा '८३' मधला पहिला लूक प्रदर्शित

दीपिकाचा '८३' मधला पहिला लूक प्रदर्शित

अभिनेत्री दीपिका पादुकोन हिचा आगामी चित्रपट  '८३' मधला पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. दीपिका या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे  माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. दीपिका रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील रोमी देव यांच्या भूमिकेतील पहिला फोटो दीपिकानं  शेअर केला आहे. 

'त्या' अफवा थांबवा, करण जोहरची विनंती

भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या  पहिल्या वर्ल्ड कपची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर सिंग हा कपील देव यांची भूमिका साकारत आहे. त्यावेळच्या फोटोतील क्षण पुन्हा  जीवंत करण्याचा प्रयत्न दीपिकानं यातून केला आहे. 

दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. दीपिका आणि रणबीरनं यापूर्वी 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या तिन्ही चित्रपटातील रणबीर-दीपिकानं साकारलेल्या भूमिकांचा अंत हा दुर्दैवी दाखवला आहे, मात्र या चित्रपटात पहिल्यांदाच चाहत्यांना अपेक्षित अशी 'हॅप्पी एडिंग' दाखवण्यात आली आहे. 

मृत्यूशी झुंज देणाऱ्या अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची मागितली माफी