पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाने चक्क कतरिनाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

दीपिका आणि कतरिना

बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्रींमध्ये कॅमेऱ्यासमोर दिसणारी मैत्री पडद्यामागे बऱ्याचदा फार वेगळी असते. त्यात  दीपिका पादुकोन आणि कतरिना कैफ यांच्यात चांगले मैत्रीचे दिवस सुरु आहेत, असे म्हटले तर कदाचित कुणाला विश्वास बसणार नाही. पण सध्या या दोघींच्यात 'अच्छे दिन' आल्याचे संकेत आहेत. 

दीपिकाने कतरिनाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्याने या दोघींमधील वाद मिटल्याचे संकेत मिळत आहेत. दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅटरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे! तुला चांगले आरोग्य लाभो, अशा आशयाची पोस्ट शेअर करत कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

यापूर्वी मुंबईत दीपिका-रणवीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये कॅटरिनाने हजेरी लावल्यानंतर सर्वांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. दोघींच्यात असणारे मतभेद संपण्याची सुरुवात असावी, अशा चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरील एकमेकींच्या पोस्टवर दोघी सकारात्मक प्रतिक्रिया देतानाही पाहायला मिळाले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: deepika padukones birthday wish katrina kaif post card perfect wishes her good health and peace