पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका '८३' च्या कलाकारांसाठी करणार खास पार्टीचं आयोजन

टीम ८३

भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपच्या विजयाची कहाणी सांगणारा '८३' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. दीपिका- रणवीरसह अनेक कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. 

'इफ्फी'मध्ये इंडियन पॅनोरमासाठी पाच मराठी चित्रपटांची निवड

लंडनमध्ये मे महिन्यापासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं त्यानंतर मुंबईत चित्रीकरणाला सुरूवात झाली आता दीपिका- रणवीरच्या वाट्याचंही चित्रीकरण पूर्ण झालं आहे.  काही मोजकीच दृश्य चित्रीत व्हायची आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ८३ मधल्या सर्वच कलाकार आणि टीमसाठी दीपिकानं खास पार्टीचं आयोजन केलं आहे. 

'बिग बॉस रिअ‍ॅलिटी शो'वर अश्लीलतेचा आरोप, शो बंद करण्याची मागणी

दीपिकानं प्रत्येक कलाकार आणि टीममधल्या सदस्यांसाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रद्वारे तिनं सर्व कलाकरांना पार्टीसाठी आमंत्रित केलं आहे.  गेल्या काही महिन्यांपासून  टीममधील प्रत्येक कलाकारासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबध निर्माण झाले  आहेत,  चित्रीकरणाचा काळा हा  सर्वात आनंददायी काळ होता, असं दीपिकानं आपल्या पत्रात लिहिलं आहे.