पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

वेश पालटून  दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर

अ‍ॅसिड हे लोकांच्या मनातदेखील असतं,  म्हणूनच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजानं बदलणं गरजेचं आहे, असं पीडितांच्या हक्कांसाठी लढणारी लक्ष्मी अग्रवाल म्हणाली होती. अनेकदा आजूबाजूच्या लोकांच्या याच नजरा हल्ल्याच्या वेदनेपेक्षा अधिक बोचऱ्या असतात, हिच मानसिकता बदलण्यासाठी दीपिकानं तिच्या नव्या मैत्रीणींसोबत एक प्रयोग करून पाहिला. 

''अश्विनी एकबोटेंनी दिलेले वचन अर्धवटच राहिले''

 दीपिका वेश पालटून अ‍ॅसिड हल्ल्यातील अनेक पीडितांसोबत मुंबईतल्या गर्दीतल्या ठिकाणी  फिरली.  दीपिका 'मालती'च्या वेशात मुंबईतली अनेक दुकानं, बाजार, ग्रोसरी शॉप अशा विविध ठिकाणी फिरली. तिच्यासह  पीडितांकडे छुपा कॅमेरा देण्यात आला होता. या कॅमेरात लोकांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड होत होत्या. 

अ‍ॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेल्या पीडिता जेव्हा रस्त्यावर मुक्तपणे फिरतात तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात, त्यांच्या चेहऱ्यावर भाव कसे असतात हे सर्व कॅमेरात टीपण्यात आलं. याचा व्हिडिओ दीपिकानं देखील शेअर केला आहे तो आवर्जून पाहण्यासारखा आहे. 

'मलंग'मध्ये अमृता खानविलकरदेखील, भूमिकेसाठी तब्बल १२ किलो वजन केलं कमी

दीपिकाचा 'छपाक्' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची  म्हणजेच मालतीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता आणि हल्ल्यातील अनेक पीडितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनापासून प्रेरित आहे. मेघना गुलजार हिनं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

CAA : ..म्हणून भाजपकडून आयोजित कार्यक्रमाला दिशा- आदित्य अनुपस्थित