पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका झाली पती रणवीरच्या '83' ची सहनिर्माती

दीपिका रणवीर

भारतानं ८३ साली जिंकलेल्या विश्वचषकाची गोष्ट सांगणारा  83 हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह अनेक कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 83 च्या निमित्तानं रणवीर- दीपिका जोडी लग्नानंतर एकत्र पहायला मिळणार आहेत. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत आहे तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नी  रोमी भाटीया  यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका या चित्रपटात रणवीरची  सहकलाकार तर आहेच मात्र या चित्रपटाची ती सहनिर्मातीही असणार आहे. 

'छपाक्' हा दीपिकाची निर्मिती असलेला पहिला चित्रपट असणार आहे. पण त्याचबरोबर ती  पती रणवीरची प्रमुख भूमिका असलेल्या 83 चित्रपटाची  सहनिर्मातीही  असल्याची माहिती  पिंकव्हिलानं दिली आहे. कपिल देव आणि रोमी यांच्या प्रेमकथेची  एक झलकही यात पहायला मिळणार आहे. 

भारताचा सामना पहायला रोमी स्टेडिअमवर आल्या होत्या मात्र जेव्हा भारताच्या हातून सामना निसटून जात असल्याचं लक्षात आल्यावर त्या  स्टेडिअमबाहेर आल्या मात्र  भारतीय संघ पुन्हा विजय खेचून  आणत असल्याचं कळल्यावर त्या पुन्हा स्टेडिअममध्ये धावत आल्या त्यावेळी पत्नी म्हणून  त्यांच्या मनात सुरू असलेली घालमेल, संघानं जिंकावं यासाठी केलेल्या प्रार्थना असा एक नाट्यमय प्रसंग यात पहायला मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.