पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला

दीपिका पादुकोन

सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोन ही सोशल मीडियावरच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली आहे. जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची दीपिकानं विद्यापीठात जाऊन भेट घेतल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्यावर काही राजकीय नेत्यांनी टीका केली तर काहींनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं. टीका- कौतुकानं राजकिय वातावरण तापलं असताना आता दीपिकाचा सरकारी जाहिरातील प्रोमो व्हिडीओ हटवला असल्याची  बाब समोर आली आहे. 

कुशल पंजाबीवर लावलेले आरोप खोटे; पत्नी आणि पालकांनी दिले निवेदन

दीपिका ही मोदी सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या एका जाहिरातीत दिसली. बुधवारी हा व्हिडिओ प्रदर्शितही झाला होता. श्रम शक्ती भवनच्या कार्यालयात हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता मात्र अचानक हा व्हिडीओ वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं.

'नवऱ्याच्या घटस्फोटाबद्दल कशाला बोलता, मी तरी कुठे व्हर्जिन आहे'

दीपिकानं ४५ सेकंदाचा व्हिडीओ चित्रीत केला होता . यात प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि कौशल्यविकासाबद्दल तिनं भाष्य केलं होतं. या व्हिडीओची निर्मिती होण्याआधी कौशल्य विकास मंत्रालयानं दीपिकाची अॅसीड हल्ल्यातील पीडितांशी भेट घडवून दिली होती. मात्र आता 'दीपिकासोत कोणताही औपचारिक करार नव्हता. कौशल्य विकासासाठी अनेक जाहिराती केल्या जातात, विभागाला जाहिरातीसाठी अनेक सर्जनशील कल्पना मीडिया हाऊसकडून सुचवल्या जातात. छपाकच्या टीमनं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमच्याशी संपर्क साधला', अस विभागानं  प्रिंटला सांगितलं. 

दीपिकाच्या टीमनं हा व्हिडीओ आम्हाला  पाठवला होता त्याचं  मुल्यमापन सुरु आहे असं विभागानं सांगितलं. मात्र दीपिकानं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.