पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या आगामी चित्रपटात अनन्या- सिद्धार्थ

दीपिका करणार अनन्या आणि सिद्धार्थसोबत काम

अभिनेत्री दीपिका पादुकोन  ही लवकरच सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत आगामी चित्रटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ चतुर्वेदीनं 'गली बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या हिनं 'स्टुडंट ऑफ द इअर २' मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या  दोन नवोदित कलाकारांसोबत दीपिका चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

दीपिकाच्या पदरात दुसरा हॉलिवूड चित्रपट?

हा चित्रपट २०२१ मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या आधी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकानं करणची भेट घेतली होती. तूर्त दीपिका आपला आगामी चित्रपट 'छपाक'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. 

 

दीपिकाचा नकार? लवच्या चित्रपटात दिसणार रणबीर- श्रद्धा

तर दुसरीकडे 'गली बॉय' फेम सिद्धार्थ हा 'बंटी और  बबली २' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राणी आणि सैफ अली खानची देखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अनन्याही चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला 'पती, पत्नी और वो' या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती लाभली असून चित्रपटानं ७६.६० कोटींची कमाई केली. 

जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध