पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका पादुकोन साकारणार द्रौपदी

दीपिका पादुकोन

पद्मावत, रामलीला, बाजीराव  मस्तानी, पिकू यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन लवकरच एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. दीपिका  द्रौपदीची भूमिका साकारणार आहे.  

बाबा आम्ही करून दाखवलं, भावांच्या विजयानंतर रितेश भावूक

निर्माता मधू मंटेना हे महाभारतावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मीड डे वृत्तपत्राशी बोलताना दीपिकानं याची माहिती दिली. आयुष्य जगण्याचा धडा आपल्याला या  महाकाव्यातून मिळाला. चित्रपटाचा भाग होण्यास मी उत्सुक आहे असं दीपिका म्हणाली. काही भागांची ही चित्रपट मालिका असणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा  २०२१ ला दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. 

'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'

या चित्रपटाव्यतिरिक्त २०२० साली दीपिकाचा 'छपाक्' आणि '८३' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.यापूर्वी आमिर खान महाभारतावर वेबसीरिज आणणार अशी चर्चा  होती. ज्यात आमिर स्वत:  कृष्णाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं.