पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बायोपिकसाठी दीपिकाचा नकार अन् ऐश्वर्याला मिळाली संधी?

दीपिका- ऐश्वर्या

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'फन्ने खान'नंतर बॉलिवूडमध्ये दिसली नाही. ती मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. पण त्याचबरोबरच ती प्रदीप सरकार यांच्या आगामी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कोलकातामधील प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री बिनोदिनी दासी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येत आहे. या बायोपिकमध्ये ऐश्वर्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ती बिनोदिनी यांची भूमिका साकारत आहे. 

VIDEO : 'चोरीचा' धम्माल 'मामला' !

बिनोदिनी दासी याची आत्मकथा  'अमरकथा' पासून प्रेरित असलेल्या या चित्रपटासाठी आधी दीपिका पादुकोनचा विचार करण्यात आला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दीपिकाची भेटही घेतली. दीपिकाला चित्रपटाची कथा आवडली होती, चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचून होकार देईन असंही दीपिकानं सांगितलं. मात्र दीपिका नंतर छपाकच्या प्रमोशनमध्ये व्यग्र झाली. जवळपास महिन्याभरानंतर दीपिकाच्या टीमनं चित्रपटासाठी नकार कळवला. दीपिकाला गंभीर भूमिका साकारायच्या नाहीत तूर्त तिचं लक्ष साध्या सोप्या भूमिकांकडे असणार आहे, असंही तिच्या टीमनं सांगितलं असल्याची माहिती  बॉलिवूड लाईफनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'चा बोलबाला

दीपिकाच्या नकारानंतर  ऐश्वर्या रायला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं. ऐश्वर्यानं चित्रपटाला होकार दिला असल्याचं समजत आहे. ऐश्वर्या  लवकरच मणिरत्नम यांच्या महत्वाकांक्षी चित्रपट  'पोंनियिन सेलवनमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कलकी लिखीत प्रसिद्ध कांदबरी 'पोंनियिन सेलवन'पासून प्रेरित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, ऐश्वर्या या चित्रपटात चोल साम्राज्याचे  खजिनदार पेरिया पज्हवेत्तुरायर यांच्या पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone Reject Aishwarya Rai Bachchan Starrer Nati Binodini Biopic according to reports