पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दीपिका- रणवीरचं देवदर्शन

दीपिका- रणवीर

बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीरनं सिंगनं नुकतंच भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. दीपिका आणि रणवीर दोघंही नोव्हेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसाआधी 'दीपवीर'नं देवदर्शन केलं. दीपिका आणि रणवीरचं कुटुंब सध्या  तिरुपतीमध्ये आहे.

आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित 

दीपिका आणि रणवीरनं गेल्यावर्षी इटलीतल्या लेक कोमो या आलिशान परिसरात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. पारंपरिक कोकणी आणि नंतर सिंधी पद्धतीनं त्यांचा विवाहसोहळा पार पडला.  लग्नाच्या वाढदिवशी दोघांनी भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. 

दीपिका वीरचे तिरुपतीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे जोडपं १५ नोव्हेंबरला सूवर्णमंदीरात दर्शनासाठी जाणार असल्याचंही समजत आहे. 

पानिपत : मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं 'मर्द मराठा' शौर्यगीत