पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Wedding Anniversary : 'दीपवीर' दर्शनासाठी सूवर्णमंदिरात

'दीपवीर' दर्शनासाठी सूवर्णमंदीरात

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंहनं शुक्रवारी पहाटे सूवर्णमंदिरात दर्शन घेतलं. ही जोडी २०१८ साली  विवाहबंधनात अडकली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दोघांनी गुरुद्वाऱ्यात माथा टेकून आशीर्वाद घेतले. 

PHOTOS : दीपिका- रणवीर तिरुपतीच्या दर्शनाला

दीपिका आणि रणवीरनं १४ नोव्हेंबरला कोकणी पद्धतीनं आणि दुसऱ्या दिवशी पारंपरिक सिंधी पद्धतीनं विवाह केला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दीपवीरनं सहकुटुंब देवदर्शन करण्याचं करण्याचं ठरवलं. यावेळी दीपिका आणि रणवीरचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. पहाटे पारंपारिक वेशात भवनानी आणि पादुकोन कुटुंब सूवर्ण मंदिरात पोहोचले.

 याआधी  दीपवीरसह दोन्ही कुटुंबीयांनी तिरुपतीचं दर्शन घेतलं होतं. दीपिका आणि रणवीरचा इटलीत विवाह पार पडला होता. दीपिका आणि रणवीर ही जोडी  लवकरच '८३' या चित्रपटातही दिसणार आहे. 

प्रार्थनांना यश लतादीदींची तब्येत सुधारतेय, कुटुंबीयांची माहिती