पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

''जेएनयूत जे काही घडलं त्याची मला चीड आली''

दीपिका पादुकोन

 अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनं मंगळवारी रात्री जेएनयूत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक ट्रोलर्सनं दीपिकाला सोशल मीडियावर  लक्ष्य केलं. मात्र जेएनयूत जे  काही घडलं त्याची मला चीड आली, सर्वांत वाईट म्हणजे हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही , असं दीपिका एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.  

दीपिकाच्या समर्थनार्थ बॉलिवूड, ट्रोलर्सनां सडेतोड उत्तर

जेएनयूत रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांच्या टोळींनी घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यात काही विद्यार्थी आणि प्राध्यपकही जखमी झाले होते. या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. मंगळवारी रात्री दीपिका जेएनयूच्या कँम्पसमध्ये उपस्थित होती. तिनं विद्यार्थ्यांची भेट घेतली. जे काही सुरू आहे त्याची मला चीड आहे  वाईट म्हणजे अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मला याचं खूप दु:ख होत आहे. अशाप्रकारच्या गोष्टी देशात नित्याच्या भाग होऊ नये इतकंच मला वाटतं. कोणीही उठतं काहीही बोलतं, काहीही करतं. याची मला भीती वाटू लागलीये. हा आपल्या देशाचा पाया नाही' अशी खंत तिनं आजतकला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. 

या खलनायकावर सल्लू मियॉ मेहरबान! गिफ्ट केली चक्क BMW कार

दीपिका तिच्या आगामी चित्रपट 'छपाक' च्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. त्यानंतर तिनं जेएनयूत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयूत विद्यार्थ्यांची भेट घेणाऱ्या दीपिकावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीकाही झाली. ती विद्यार्थ्यांसाठी नाही तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्यापीठात गेली अशी टीका तिच्यावर करण्यात आली. मात्र  ठोस भूमिका घेणाऱ्या दीपिकाच्या समर्थनार्थ संपूर्ण  बॉलिवूड पुढे आलं आहे.