पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेव्हा दीपिका स्वत:चीच खिल्ली उडवते

जेव्हा दीपिका स्वत:चीच खिल्ली उडवते

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंहनं नुकतीच आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. या पुरस्कार सोहळ्यात नेहमीप्रमाणे आपल्या हटके फॅशननं रणवीरनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. रणवीरसोबतच दीपिकाचा पेहरावही तितकाच हटके होता.

आनंद कुमार ते कबीर, दोन महिन्यांत हृतिकनं करून दाखवली अशक्य गोष्ट शक्य

 दीपिका-रणवीरची ही आगळी वेगळी फॅशन सोशल मीडियावर मस्करीचा विषय ठरण्याआधीच दीपिकानं स्वत:ची खिल्ली उडवली. दीपिकानं सोशल मीडियावर मीम्स शेअर केलं ज्यात तिनं आपल्या आणि रणवीरच्या लूकची तुलना केली होती. 

दीपिका मीम्स

जयललितांच्या बायोपिकसाठी कंगना घेतेय विशेष मेहनत

दीपिकाची ही विनोदबुद्धी सर्वांनाच खूप आवडली. दीपिकानं शेअर केलेलं हे मीम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. रणवीर हा त्यांच्या जगावेगळ्या हटके फॅशन स्टाइलसाठी ओळखला जातो. रणवीरसोबत लग्न केल्यानंतर दीपिकाही अनेकदा अशा हटके स्टाईलची निवड करताना दिसून आली आहे.