पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून दिल्लीत 'छपाक'चं प्रमोशन दीपिका- मेघनानं केलं रद्द

दीपिका पादुकोन

दीपिका पादुकोनची प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपट पुढील महिन्यात १० तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम दीपिका आणि मेघनानं रद्द केला आहे.

CAA : ट्विटमध्ये गंभीर चूक, फरहाननं मागितली जाहीर माफी 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शनं सुरु आहे. सध्या इथल्या वातावरणात तणाव आहे. अशात जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणावरून सोशल मीडियावर  नेटकरी अधिक आक्रमक झाले आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून दीपिका- मेघनानं दिल्लीतील प्रमोशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

फोर्ब्स सेलिब्रिटी १०० यादीत सलमानची घसरण, अक्षय कुमार वरच्या स्थानी

दिल्लीमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत, अशा वातावरणात प्रमोशन करण असंवेदनशील ठरेल. दिल्लीत शांतता नांदावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत असं दोघींनी म्हटलं आहे. 'छपाक' चित्रपट हा अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Deepika Padukone Meghna Gulzar announced they will not be promoting Chhapaak in New Delhi