पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकानं घेतली नितू- ऋषी कपूर यांची भेट

दीपिका - ऋषी कपूर

'मेट गाला'निमित्तानं  अभिनेत्री दीपिका पादुकोन  गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये होती. कार्यक्रम संपल्यानंतर दीपिकानं वेळ काढून  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. ऋषी कपूर यांच्या पत्नी नितू कपूर यांनी दीपिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र याच फोटोमुळे अनेकांच्या ट्रोल्सला त्या बळी पडल्या आहे.

काही वर्षांपूर्वी दीपिका ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरला डेट करत होती. मात्र  कटू अनुभव घेऊन दीपिका या नात्यातून बाहेर पडली. २०१०  साली 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात  दीपिका आणि सोनम कपूर या दोघांनी  उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात हृदयभंगाच्या अनुभवातून गेलेल्या दीपिकानं रणबीरवर बोचरी टीका केली होती. तिची टीका  ऋषी यांना खूप खटकली होती. ऋषी यांनी दीपिकाला तितकंच बोचरं उत्तर दिलं होतं. 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी तिची गत झालीये. समजूतदार व्यक्तींप्रमाणे तिनं वागलं पाहिजे. माझा तिला सल्ला आहे की तिनं आपल्या सहकलाकाराविषयी चुकीच्या गोष्टी पसरवणं थांबवावं' असं ऋषी कपूर म्हणाले होते. मात्र आता ऋषी कपूर यांच्या  पत्नीनं त्याच दीपिकाचं भरभरून कौतुक केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Such a fun evening with adorable @deepikapadukone .. gave lot of love n warmth 😍🥰

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

नितू यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या. 'जेव्हा ती तुमच्या मुलाची प्रेयसी होती तेव्हा तुम्हाला ती कधीच आवडली नाही' अशी प्रतिक्रिया एका युजरनं लिहिली.  'ती रणबीरची प्रेयसी असताना तुम्ही तिचा द्वेष केला आता अचानक  ती तुम्हाला प्रिय कशी झाली' अशी प्रतिक्रिया  दुसऱ्या एका ट्विटर युजरनं  दिली आहे.  
दीपिकाशी ब्रेकअप केल्यानंतर रणबीर कतरिनाला डेट करु लागला. कतरिनाशीही ब्रेकअप झाल्यानंतर आता  रणबीर कतरिना आणि दीपिकाची जवळची मैत्रिण अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. हे दोघंही लग्न करणार अशाही चर्चा आहेत.