पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाला साकारायचीये 'देसी सुपरवुमन'

दीपिका पादुकोन

बाजीराव मस्तानी, पद्मावत, पिकू, रामलीला सारख्या चित्रपटांतून आपली स्वतंत्र्य ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन लवकरच काहीतरी नवं करण्याच्या तयारीत आहे. दीपिकाला आता  सुपरवुमन साकारायची आहे. हॉलिवूडसारखी देसी सुपरहिरोंची फौज भारतातही असावी अशी दीपिकाची इच्छा असून या दृष्टीनं दीपिकाचे प्रयत्न सुरु आहेत. 

प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं, आयुष्माननं मानले आभार

दीपिका तिचं 'देसी सुपरवुमन' साकारण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे, २०२० पर्यंत दिपिकाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल अशी माहिती मीड डेनं दिली आहे. 

हृतिकचा समावेश 'आशियातील रुबाबदार व्यक्तीं'च्या यादीत

सध्या कल्पनेविषयी दीपिकाचं निर्माते, दिग्दर्शक आणि इतर कलाकारांशी बोलणं सुरु आहे तसेच बॉलिवूडचे देसी सुपरहिरोंना एकत्र करुन नवी काहीतरी सुरु करण्याची दीपिकाची इच्छा असल्याचंही समजत आहे. आतापर्यंत हृतिक रोशननं क्रिश, टायगर श्रॉफनं फ्लाइंग जट, शाहरुख खाननं जी.वन, रजनीकांत यांनी चिट्टी रॉबोट या सुपरहिरोंच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.