पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या समर्थनार्थ बॉलिवूड, ट्रोलर्सनां सडेतोड उत्तर

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोननं मंगळवारी रात्री जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. रविवारी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर अज्ञान हल्लेखोरांनी हल्ला केला होता यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले होते. या संपूर्ण घटनेवर देशातलं राजकीय वातावरण तापत आहे. या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. 

अभिनेत्री दीपिका पादुकोन हिनं जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. तिनं घेतलेल्या भूमिकेवर अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. दीपिकानं या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिची  भेट घेतली. मात्र सोशल मीडियावर काहींनी दीपिकाला ट्रोलही केलं.

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

दीपिकाचा 'छपाक' हा आगामी चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका दिल्लीत होती आणि चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून दीपिकानं ही भेट घेतली, हा दीपिकाच्या स्टंटबाजीचा प्रकार असल्याचं म्हणत काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र तिच्या समर्थनार्थ बॉलिवूड पुढे आलं आहे. दीपिका ही अत्यंत धाडसी मुलगी आहे. तिला प्रमोशनसाठी असल्या स्टंटबाजीची आवश्यकता नाही. तिनं तिची ठोस भूमिका घेतली, अनेकजण अशाप्रकारची भूमिका घ्यायला कचरतात मात्र दीपिकानं ते करून दाखवलं अशा  शब्दात दीपिकाचं  कौतुक करत अनेक बॉलिवूड कलाकार तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. 

करणनं 'तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये केली कपात?