पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करण जोहरच्या आगामी चित्रपटात दीपिका झळकण्याची चर्चा

दीपिका- करण

रामलीला, बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत असे हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसू शकते. २०१९ या वर्षांत दीपिकाचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.  पद्मावतच्या यशानंतर दीपिकानं काही काळ  विश्रांती घेत निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. 

'एक दिवस रेड कार्पेटवर नऊवारी साडीच नेसून जाईन'

निर्माती म्हणून दीपिकाचा  पहिला चित्रपट 'छपाक्' जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.  ती '83' चित्रपटातही दिसणार आहे. पण त्याचबरोबर ती करण जोहर निर्मित चित्रपटातही दिसू शकते. काही दिवसांपूर्वी दीपिकाला करण जोहरच्या ऑफिसमध्ये पाहण्यात आलं. यावेळी  आगामी चित्रपटाची कथाही दीपिकाला ऐकवण्यात आली होती.  या चित्रपटाची कथा महिला केंद्रीत असून दीपिकालाही ती आवडली असल्याचं समजत आहे. या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  

प्रियांका चोप्रा IMDB टॉप १० सिने- टीव्ही कलाकारांच्या यादीत 'नंबर १'

दीपिकाचा 'छपाक्'  जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला असून दीपिकासह विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका यात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे.