पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

....म्हणून अभिनेत्री दीपिका विकतेय स्वत:चे कपडे

दीपिकानं तिचं विंटर कलेक्शन विक्रीसाठी आणलंय

दीपिका पादुकोन एका उपक्रमासाठी  आपलं योगदान देत आहे. दीपिकानं ऑक्टोबर महिन्यात तिचे काही कपडे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवले होते. तिच्या उपक्रमाला अल्पावधित चांगला प्रतिसाद लाभला होता. आता दीपिकानं तिचं विंटर कलेक्शन विक्रीसाठी आणलं आहे. 

'पती, पत्नी वो'मधल्या वैवाहिक बलात्कारच्या संवादासाठी भूमीची माफी

दीपिकानं तिच्या क्लोसेटमधले थंडीचे उबदार कपडे, फूटवेअर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यात दीपिकाचे महागडे आणि ब्रँडेड स्वेटर, नीट ड्रेस, शॉल, स्नग बूट, स्मार्ट जॅकेट, पी कोटचा समावेश आहे. हे कपडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यामागे प्रमुख कारण आहे. 

स्वत: नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या दीपिकानं 'द लिव, लव, लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली. याद्वारे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येते तसेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. या संस्थेला आर्थिक मदत व्हावी यासाठी दीपिका आपल्या कपड्यांच्या विक्रीतून निधी गोळा करत आहेत.

गरीब मुलांना मदत करतानाचे माझे फोटो काढू नका, जान्हवीची विनंती

 कपड्यांच्या विक्रीतून येणार निधी 'द लिव, लव, लाफ फाउंडेशन'साठी वापरण्यात येणार आहे. दीपिका दर महिन्याला तिचे काही खास कपडे, ज्वेलरी, अॅक्सेसरीज आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार आहे. ग्राहकांना दीपिकाच्या या खासगी वेबसाईटद्वारा वस्तू विकत घेता येणार आहेत.