पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका पादुकोनच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत विक्री, पैश्यांतून संस्थेला करणार मदत

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोन ही ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अभिनयाबरोबरच मानसिक आरोग्याविषयी तिनं जगजागृती मोहीम राबवली आहे. तिनं आपल्या 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ला मदत करण्यासाठी नवा उपक्रम राबवला आहे. 

दर महिन्याला दीपिका तिचे काही खास कपडे, ज्वेलरी, अॅक्सेसरीज आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवणार आहे. ग्राहकांना दीपिकाच्या या खासगी वेबसाईटद्वारा वस्तू विकत घेता येणार आहेत. कपडे, ज्वेलरीच्या विक्रीतून आलेली रक्कम दीपिका तिची स्वयंसेवी संस्था 'द लिव लव लाफ फाउंडेशन'साठी वापरणार आहे. 

... आणि 'गर्ल्स' 'ची 'मॅगी' सापडली!

दीपिकानं सोशल मीडियाद्वारे या संकल्पनेची माहिती दिली. तिनं संकेतस्थळाद्वारे  आपलं क्लोसेट विक्रीसाठी ठेवलं आणि अवघ्या २ तासांत यावरील सर्व कपडे आणि इतर वस्तू विकल्या गेल्या. 

दीपिकानं  सोशल मीडियाद्वारे तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानले आहेत. स्वत: नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या दीपिकानं 'द लिव लव लाफ फाउंडेशन'ची स्थापना केली. याद्वारे मानसिक आरोग्यावर जनजागृती करण्यात येते तसेच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात दिला जातो. 

बिग बींसोबत अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या रोमांचकारी अनुभवांचा 'खुदा गवाह'